मुख्य घटक वगळा
मेन्यू उघडण्यासाठी क्लिक करा
बंद मेन्यूवर क्लिक करा
मुख्य आशयाला सुरुवात

कीटक व्यवस्थापन आणि मातीच्या सुपीकतेसाठी एफएमसी इंडियाची नवीन तीन उत्पादने

हैदराबाद, सप्टेंबर 5, 2022: : एफएमसी इंडिया या कृषी विज्ञान कंपनीने आज भारतीय शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी चांगल्या दर्जाचे उत्पादन आणि सुधारित मातीच्या प्रोफाईल द्वारे चांगले उत्पादन प्राप्त करण्यासाठी तीन नवीन उत्पादनांसह आपला पोर्टफोलिओ विस्तार जाहीर केला आहे.

1

उद्घाटन सोहळ्यात बोलताना एफएमसी इंडियाचे अध्यक्ष श्री. रवी अन्नावरपू म्हणाले, "एफएमसी इंडियाने तीन दशकांहून अधिक काळापासून भारतीय शेतकऱ्यांना सेवा दिली आहे आणि आम्ही भारतीय कृषीच्या शाश्वततेत योगदान देत त्यांच्या समृद्धीस सक्षम करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आज सादर केलेले नवीन उपाय हे शेतकऱ्यांच्या आव्हानांची ओळख करून त्यांना प्रभावीपणे आणि त्वरित सानुकूलित कल्पनांद्वारे संबोधित करण्यासाठी एफएमसीच्या सखोल अनेक वर्षांच्या संशोधनाचे परिणाम आहेत.”



टालस्टार® प्लस कीटकनाशक हे एक नवीन सर्वंकष मिश्रण आहे जे रसशोषक आणि चावणाऱ्या कीटकांपासून संरक्षण प्रदान करते जे भुईमूग, कापूस आणि ऊस पिकांच्या भारतीय शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या आहे. हे उत्पादन शेतकऱ्यांना भुईमूगातील हुमणी, फुलकिडे आणि मावा; कापसातील राखाडी भुंगा, मिली कीटक, तुडटुडे, पांढरी माशी, फुलकिडे आणि मावा आणि ऊस पिकातील वाळवी आणि शेंडा पोखरणारी अळी यांच्यासह लढा देण्यासाठी एक उत्कृष्ट साधन देते. टालस्टार® प्लस कीटकनाशक हे देशभरातील अग्रगण्य रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे.

2



पेट्रा® बायोसोल्यूशन हे मातीच्या भौतिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रतिक्रियाशील कार्बन तंत्रज्ञानाद्वारे समर्थित नवीन पिढीचा एक सानुकूलित उपाय आहे. हे मातीमध्ये वापरलेल्या फॉस्फरसला एकत्रित करून अत्यावश्यक प्रारंभिक लाभासह पिकांना बळकटी देते. सेंद्रिय पदार्थांसह मजबूत, पेट्रा® बायोसोल्यूशन मातीच्या सूक्ष्मजीवांसाठी अन्नाचे स्त्रोत म्हणून कार्य करते, पोषक द्रव्यांना सुलभ करते, मातीची पोत वाढवते आणि मातीची सुपीकता वाढवते. हे वापरण्यास सोपे आहे, अधिकांश पिकांसाठी योग्य आहे आणि निरोगी माती, मूळ आणि वनस्पतींसाठी मजबूत पाया तयार करते. पेट्रा® बायोसोल्यूशन डिसेंबर 2022 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.



कॅझबो® क्रॉप न्युट्रीशन, एक विशेष सूक्ष्म पोषक उपाय आहे, जे कॅल्शियम, झिंक आणि बोरॉन सारख्या आवश्यक घटकांची पूर्तता करून पिकांना प्रभावीपणे पोषण देते आणि बहुतांश पिकांमध्ये अनेक कमतरता आणि संबंधित विकार दूर करण्यासाठी काम करते. पारंपारिक कॅल्शियम उपायांच्या तुलनेत हे अधिक चांगली कार्यक्षमता प्रदान करते जेव्हा

योग्य मात्रा मध्ये आणि पीक वाढीच्या चक्राच्या योग्य टप्प्यावर वापरले जाते. कॅझबो® क्रॉप न्युट्रीशन सुधारित फळ गुणवत्ता आणि पिकाची साठवण क्षमता यामध्ये लक्षणीय योगदान देण्याचे वचन देते. कॅझबो® क्रॉप न्युट्रीशन डिसेंबर 2022 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.

3



एफएमसी इंडियाचा भारतीय शेतकर्‍यांना मिळणारा पाठिंबा केवळ त्यांच्या विस्तृत उत्पादनापुरताच मर्यादित नाही. संपूर्ण भारतभर पिकवल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या पिकांचा समावेश असलेल्या चांगल्या कृषी पद्धतींचा प्रचार करून कंपनी शेतकऱ्यांसाठी सानुकूलित प्रशिक्षण कार्यक्रम वर्षभर चालवत आहे. उदाहरणार्थ, शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने आदर्श गाव कार्यक्रमावर प्रोफेसर जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठ (हैदराबाद) सह भागीदारी देखील केली आहे. याव्यतिरिक्त, एफएमसी इंडिया त्यांच्या प्रमुख समुदाय व्याप्ती कार्यक्रम प्रकल्प समर्थ द्वारे ग्रामीण समुदायांना स्वच्छ आणि सुरक्षित पेयजल प्रदान करण्यासाठी काम करते. याने देशातील 57 पेक्षा जास्त रिव्हर्स ऑस्मोसिस वॉटर प्लांटच्या स्थापनेसह 100,000 पेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांना शुद्ध पाणी प्रदान केले आहे.



एफएमसी विषयी

एफएमसी कॉर्पोरेशन ही एक जागतिक कृषी विज्ञान कंपनी आहे जी उत्पादकांना बदलत्या वातावरणाशी जुळवून घेत वाढत्या जागतिक लोकसंख्येसाठी अन्न, खाद्य, फायबर आणि इंधन तयार करण्यात मदत करण्यासाठी समर्पित आहे.. एफएमसीचे नाविन्यपूर्ण पीक संरक्षण उपाय - जैविक, पीक पोषण, डिजिटल आणि अचूक कृषी सहित - उत्पादक, पीक सल्लागार आणि हरळी (टर्फ) आणि कीटक व्यवस्थापन व्यावसायिकांना पर्यावरणाचे संरक्षण करताना आर्थिकदृष्ट्या त्यांच्या सर्वोत्तम आव्हानांचे निवारण करण्यास सक्षम करतात. जगभरात 100 हून अधिक कार्यस्थळावर अंदाजित 6,400 कर्मचाऱ्यांसह, एफएमसी नवीन तणनाशक, कीटकनाशक आणि बुरशीनाशक सक्रिय घटक, उत्पादन तयार करणे आणि ग्रहासाठी सातत्याने चांगले असणारे अग्रणी तंत्रज्ञान शोधण्यासाठी वचनबद्ध आहे. अधिक जाणून घेण्यासाठी भेट द्या fmc.com आणि ag.fmc.com/in/en आणि एफएमसी इंडियाला फेसबुक® आणि यू-ट्यूब®वर फॉलो करा.