मुख्य घटक वगळा
मेन्यू उघडण्यासाठी क्लिक करा
बंद मेन्यूवर क्लिक करा
मुख्य आशयाला सुरुवात

समुदाय प्रतिबद्धता आणि विकास हे शाश्वतता आणि सामाजिक बांधिलकी निधीच्या पूर्ततेसाठीचे एफएमसीचे अविभाज्य अंग आहे. आम्ही देशाच्या विविध भागांमध्ये ग्रामीण आणि निम-शहरी समुदायांसोबत काम करतो. ज्यामुळे त्यांचे आरोग्य आणि जीवनाचा दर्जा उंचविण्यासाठी विविध संसाधनांची त्यांना सुलभरित्या उपलब्धता होऊ शकेल. ग्रामीण समुदाय सोबतच, आमचे विशेष लक्ष आमच्या उत्पादन केंद्राच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या समुदायांचे जीवन सर्वोत्तम बनविण्यावर आहे.

एफएमसी इंडियाचा पानोली, गुजरात याठिकाणी आधुनिक उत्पादन प्रकल्प आहे. आम्ही प्रकल्पाच्या सभोवताली संसाधनाच्या उपलब्धतेत वाढ होण्याच्या उद्देशाने सामाजिक पायाभूत सुविधांच्या उभारणीवर भर देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहे. आमची अलीकडील कामे: नजीकच्या गावातील शाळांना संगणकांचे वाटप, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल्स, क्रीडा स्पर्धांचे प्रायोजकत्व स्वीकारले आणि गावात लघु क्रीडा-संकुलाची उभारणी. आम्ही औद्योगिक पार्कच्या प्रवेशद्वारावर हरित प्रदेश निर्माण करण्याची जबाबदारी स्विकारली आहे. लॉन्सची निगा, झाडे आणि वनस्पतींची लागवड. वॉटर स्प्रिंकलर्स इंस्टॉलेशन, जॉगिंग ट्रॅक आणि ग्रीन बेल्ट दरम्यान वॉटर रिचार्ज पॉड या सर्वांची जबाबदारी एफएमसी मार्फत घेतली जाईल. आम्ही नियमितपणे वृक्षारोपण मोहीम, गावामध्ये बाकांची निर्मिती , प्रवासी कामगारांना खाद्य पाकिट यांचे वितरण इ. सारख्या इतर उपक्रमांचे आयोजन करतो.

पानोली प्रकल्प हा एफएमसीचा पहिला उत्पादन प्रकल्प आहे. या प्रकल्पावर 50 MW सौर संयंत्राद्वारे त्यांच्या ऊर्जा आवश्यकतेच्या 15% ऊर्जा प्राप्त केली जाते. अधिक सौर ऊर्जा प्राप्त करणे आणि कार्बनच्या टक्केवारीत घट हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.

अशा प्रकारच्या मोहिमा आणि कल्याणकारी प्रकल्पातून आम्ही समुदायाशी बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करित आहोत आणि आपल्या इकोसिस्टीमच्या विकासासाठी हातभार लावत आहोत.