मुख्य घटक वगळा
मेन्यू उघडण्यासाठी क्लिक करा
बंद मेन्यूवर क्लिक करा
मुख्य आशयाला सुरुवात

सर्वोत्कृष्ट गुणवत्तेला योग्य संधी देणं आणि आमच्यासोबत प्रगतीस अनुकूल करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.

आम्ही तुम्हाला तुमची आवड जाणून घेण्यासाठी आणि एफएमसी इंडियासह तुमचे करिअर विकसित करण्यासाठी आमंत्रित करतो.

आमच्यासोबत सहभागी व्हा! आम्हाला येथे लिहा employeereferral@fmc.com

कॅम्पस व्याप्ती

कॅम्पस प्रोग्राम हा एफएमसी इंडियाचा उपक्रम आहे, ज्यात इंटर्नशिप, मॅनेजमेंट ट्रेनी आणि एफएमसी कॅम्पस-कनेक्ट या महत्वाकांक्षी उपक्रम अंतर्गत गुणवंतांशी संपर्क केला जातो आणि नेतृत्व गुणांचा विकास केला जातो. इंटर्नशिप प्रोग्राम मार्फत नवीन पिढीला त्यांचा कॉर्पोरेट अनुभव वाढविण्यासाठी आणि स्पर्धात्मक व्यवसाय वातावरणात व्यवसायाच्या नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक क्षमता विकसित करण्यासाठी आकर्षक संधी उपलब्ध करून देत आहे आणि एफएमसी इंडिया मधील चांगल्या आणि आव्हानात्मक करिअरच्या संधीसाठी सज्ज केले जाते.

मॅनेजमेंट ट्रेनी हा एक वर्षाचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे.. एफएमसी इंडियाच्या जलद वाढणाऱ्या व्यवसायात कामाची संधी मिळवून यशस्वी करिअर घडविण्यासाठी ही एक अप्रतिम संधी आहे. यामध्ये सेल्स/मार्केटिंग/फिल्ड डेव्हलपमेंट मधील नियुक्तीनंतर विविध कामांद्वारे संपूर्ण मॅनेजमेंटचा अनुभव मिळतो.

एफएमसी कॅम्पस-कनेक्ट हा एक विद्यार्थी संवाद कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश भारतातील विविध कृषी विद्यापीठे किंवा संस्थांमधील शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील गुणवंतांचा शोध घेऊन त्यांना सहाय्य करणे हा आहे.. या कार्यक्रमाद्वारे कीटकशास्त्र, पॅथोलॉजी, कृषी विज्ञान, मृदा विज्ञान क्षेत्रातील पीएचडी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सहाय्य केले जाते.