मुख्य घटक वगळा
मेन्यू उघडण्यासाठी क्लिक करा
बंद मेन्यूवर क्लिक करा
मुख्य आशयाला सुरुवात
News & Insights

समुदाय प्रतिबद्धता

Distribution of PPE Kits & Awareness on Safe use of Pesticides.कीटकनाशकांची चुकीच्या पद्धतीने हाताळणी ही महाराष्ट्रातील दीर्घकालीन समस्या आहे. पिकांच्या पोषणास वर्धक ठरणाऱ्या उत्पादनांची चुकीच्या पद्धतीने हाताळणी केल्यामुळे यवतमाळ आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील 30 शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे 2017 हे वर्ष सर्वाधिक आपत्तीजनक ठरले. त्यानंतर महाराष्ट्र कृषी विभागाने विविध कृषी रासायनिक कंपन्यांच्या सहयोगाने कीटकनाशकांच्या सुरक्षित वापराविषयी सातत्याने जागरुकता निर्माण करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

सर्व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या दृष्टीकोनातून आम्ही एफएमसी मध्ये व्यवस्थापनाला प्राधान्य देतो ही आमची महत्वाची जबाबदारी आहे.. 2018 आणि 2019 मध्ये, कृषी विभागाच्या समन्वयातून एफएमसीने चंद्रपूर जिल्ह्यातील या समस्येवर मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली. यावर्षी शेतकऱ्यांमध्ये कीटकनाशक सुरक्षा जागरुकता निर्माण मोहिमेसाठी अकोला जिल्ह्यासाठी एफएमसीची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे.

कृषी विभाग, आरोग्य विभाग आणि केव्हीके यांच्या सहकार्याने आम्ही या विषयावर विविध मोहीम चालवत आहोत Distribution of PPE Kits & Awareness on Safe use of Pesticides.. उच्च परिणामकारकता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरीय अधिकाऱ्यांच्या समन्वयातून व्हॅन मोहिमेची अंमलबजावणी केली जात आहे. पहिल्या व्हॅन मोहिमेचे उद्घाटन अकोला जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र पापडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

आत्मा (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) च्या समन्वयाने, आम्ही केवळ अकोला जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना नव्हे तर लगतच्या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीपीई किटचे वितरित करीत आहोत. प्रत्येक किटमध्ये एप्रॉन, मास्क, डोळ्यांचे संरक्षक गिअर आणि ग्लोव्ह्ज समाविष्ट आहेत.. व्हॅन मोहिमेत मर्यादित शेतकऱ्यांच्या समूह बैठकीचे आयोजन करण्यासाठी आणि त्यांना पीपीई किटच्या वापराचे प्रशिक्षण देण्यासाठी केला जात आहे. टीएओ (तालुका कृषी अधिकारी) यांनी आमच्या मोहिमेमध्ये सहभाग नोंदविला आणि शेतकरी आणि शेत मजूर यांना विविध पिकांवर किटकनाशकांच्या सुरक्षित फवारणी विषयी मार्गदर्शन केले.

Distribution of PPE Kits & Awareness on Safe use of Pesticides.आतापर्यंत, आम्ही या मोहिमेअंतर्गत 115 गावांमध्ये 5000 शेतकरी आणि शेत मजूर यांच्यापर्यंत पोहोचलो आहोत. आम्ही या मोहिमेची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि पिक संरक्षक उत्पादनांच्या सुरक्षित वापराची सुनिश्चिती आणि जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सरकारी प्राधिकरण यांच्यासोबत कार्यरत आहोत.