मुख्य घटक वगळा
मेन्यू उघडण्यासाठी क्लिक करा
बंद मेन्यूवर क्लिक करा
मुख्य आशयाला सुरुवात

एफएमसीची ग्रामीण भारतात कोविड-19 विषयी जागरूकता

भारतातील लोकांसोबत राहण्याच्या वचनाचा भाग म्हणून, कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेचा प्रभावीपणे सामना करित आहे. एफएमसी इंडियाने कोरोना विषाणू विषयी जागृती आणि ग्रामीण भागात प्रसारापासून प्रतिबंध करण्यासाठी बहुउद्देशीय प्रबोधन मोहिम हाती घेतली आहे.

एफएमसीने 20 दिवसांपेक्षा जास्त दिवस दैनंदिन भाग प्रसारित करण्यासाठी एआरडीईए (कृषी ग्रामीण विकास आणि पर्यावरण जागरूकता) फाऊंडेशन आणि डिजिटल मीडिया चॅनेल ग्रीन टीव्ही सह भागीदारी केली आहे. प्रत्येक संवादात्मक भागामध्ये वैद्यकीय तज्ज्ञ असतील, जे आजाराच्या विविध बाबींवर दर्शकांना मार्गदर्शन करतील आणि लाईव्हस्ट्रीम दरम्यान प्रश्नांची उत्तरे देतील.

एफएमसी इंडियाचे नॅशनल सेल्स आणि मार्केटिंग डायरेक्टर रवी अन्नावारापू म्हणतात, " कोविड-19 लक्षणांविषयी असणारे अपुरे ज्ञान आणि चाचणीसाठी असणारी नकारात्नकता तसेच ग्रामीण भागात असलेले उपचार यामुळे ग्रामीणभागाता अनाठायी भीती निर्माण झाली आहे. भारताच्या ग्रामीण भागाला कोरोना विषाणूपासून संरक्षित आणि जनतेचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. आमच्या समुदाय सबलीकरणाचा भाग म्हणून प्रकल्प समर्थ हाती घेण्यात आला. एफएमसी इंडियाने लोकांना बाधित होण्यापासून संरक्षित करण्यासाठी सकारात्मक उपाययोजना हाती घेऊन लोकांना सहाय्य करण्यासाठी पावले उचलली आहेत.”

1.3 दशलक्षपेक्षा अधिक दर्शकांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. मालिकेला "COVID-मुक्त गाव" असे शीर्षक आहे" आणि जून 1, 2021 पासून प्रत्येक सकाळी 8:30am वाजता ग्रीन टीव्ही फेसबुक आणि यूट्यूब चॅनेल्सवर प्रसारित झाला आणि अंतिम भाग जून 20, 2021 तारखेला प्रसारित करण्यात आला. एफएमसी इंडियाच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनेल्सवरुन सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी एपिसोड अपलोड करण्यात आले आहेत.

20-दिवसांच्या सीरिज व्यतिरिक्त, कोविड-सुसंगत वर्तनाविषयी जागृती निर्माण करणारा लघुपट लवकरच प्रदर्शित केला जाईल. एफएमसी त्यांच्या सोशल मीडिया चॅनेल्सद्वारे शेतकऱ्यांसोबत कोविड-19 वरील शैक्षणिक माहिती आणि उपयुक्त माहिती प्रदर्शित करेल.

जर तुम्ही लाईव्ह सेशन पाहू शकला नसल्यास याठिकाणी पाहू शकता: