मुख्य घटक वगळा
मेन्यू उघडण्यासाठी क्लिक करा
बंद मेन्यूवर क्लिक करा
मुख्य आशयाला सुरुवात

एफएमसीची भारतीय शेतकऱ्यांसाठी ड्रोन स्प्रे सेवा

09 फेब्रुवारी, मुंबई

एफएमसी कॉर्पोरेशन, या कृषी विज्ञान कंपनीने, आज जाहीर केले की त्यांनी भारतीय शेतकऱ्यांसाठी ड्रोन स्प्रे सेवा सुरू केल्या आहेत.

नागरी विमानवाहतूक महासंचालनालय (डीजीसीए), भारतातील हवाई वाहतूक सेवांच्या नियमनासाठी जबाबदार सरकारी संस्था द्वारे मंजूर, ड्रोन सेवा शारीरिक श्रमाची आवश्यकता कमी करून शेतातील उत्पादकता सुधारण्याची अपेक्षा आहे. एफएमसीची ड्रोन स्प्रे सेवा एफएमसी इंडिया फार्मर ॲपमार्फत वापरली जाऊ शकते, जी सात प्रादेशिक भारतीय भाषांना सपोर्ट करते. ही सेवा सध्या आंध्र प्रदेशमध्ये उपलब्ध आहे आणि महिन्याच्या अखेरीस मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये उपलब्ध होईल.

drone 1

एफएमसी इंडियाचे अध्यक्ष श्री. रवी अन्नावरपू म्हणाले, "कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित होत असल्याने, वर्ष 2030 च्या अखेरीस देशातील एकूण कृषी यंत्रसामग्रीच्या खर्चापैकी 2 टक्के ड्रोनचा वाटा अपेक्षित आहे. या प्रायोगिक टप्प्यात, एफएमसी भारतीय शेतकरी समुदायाच्या फायद्यासाठी ड्रोन ॲप्लिकेशनमध्ये आपल्या गहन जागतिक ज्ञान आणि कौशल्याचा लाभ घेईल. पहिल्या तीन महिन्यांत निवडक राज्यांमधील भारतीय शेतकऱ्यांपर्यंत आमची पोहोच जास्तीत जास्त वाढवण्याची आणि त्यानंतर पुढील खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी देशभरातील शेतकर्‍यांपर्यंत सेवा विस्तारित करण्याची आमची योजना आहे.”

कृषी मानवरहित हवाई वाहने (यूएव्ही) स्प्रे एकसमानता आणि कव्हरेजवर अधिक नियंत्रणास अनुमती देतात तसेच एफएमसीचे प्रीमियम आणि शेतकरी-विश्वसनीय ब्रँड्स कोराजन® कीटकनाशक आणि बेनेविया® कीटकनाशक यासारख्या पीक संरक्षण उत्पादनांच्या तंतोतंतपणात सुधारणा करतात. प्रत्येक स्प्रे ड्रोन 15-20 मिनिटांमध्ये 3-4 एकर कव्हर करण्यास सक्षम आहे, ज्यामुळे फवारणीचे काम सोपे आणि जलद होते. यूएव्ही चा वापर केल्यास उष्माघातासारख्या पर्यावरणीय जोखमींपासून शेतकऱ्यांचे संरक्षण होईल.

drone2

श्री. अन्नावरपू पुढे म्हणाले, "शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण उपाय उपलब्ध करून देण्याच्या दिशेने नेहमीच आमचे प्रयत्न असतात जेणेकरून ते शाश्वत पद्धतीने उत्पादन वाढवू शकतील. आम्ही ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि वित्तपुरवठा प्रदान करू. याव्यतिरिक्त, ड्रोन ऑपरेशन्ससारखी आवश्यक कौशल्ये विकसित करताना तंत्रज्ञानासह कृषी आधुनिकीकरणावरील सरकारचे लक्ष, अचूक कृषीच्या व्यापक उपयोगाची खात्री करेल. भारतीय कृषी बदलाच्या उंबरठ्यावर आहे आणि आम्हाला विश्वास आहे की कृषी पद्धतींच्या परिवर्तनात ड्रोन सेवा महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. भारतीय शेतकरी समुदायासाठी या सेवेचे प्रणेते असल्याचा आम्हाला अभिमान आहे.”

एफएमसी फार्मर ॲप आयओएस ॲपस्टोअर आणि अँड्रॉईड प्ले स्टोअर दोन्हीवरून डाउनलोड केले जाऊ शकते.

एफएमसी विषयी

एफएमसी कॉर्पोरेशन ही एक जागतिक कृषी विज्ञान कंपनी आहे जी उत्पादकांना बदलत्या वातावरणाशी जुळवून घेत वाढत्या जागतिक लोकसंख्येसाठी अन्न, खाद्य, फायबर आणि इंधन तयार करण्यात मदत करण्यासाठी समर्पित आहे.. एफएमसीचे नाविन्यपूर्ण पीक संरक्षण उपाय - जैविक, पीक पोषण, डिजिटल आणि अचूक कृषी सहित - उत्पादक, पीक सल्लागार आणि हरळी (टर्फ) आणि कीटक व्यवस्थापन व्यावसायिकांना पर्यावरणाचे संरक्षण करताना आर्थिकदृष्ट्या त्यांच्या सर्वोत्तम आव्हानांचे निवारण करण्यास सक्षम करतात. जगभरात 100 हून अधिक कार्यस्थळावर अंदाजित 6,400 कर्मचाऱ्यांसह, एफएमसी नवीन तणनाशक, कीटकनाशक आणि बुरशीनाशक सक्रिय घटक, उत्पादन तयार करणे आणि ग्रहासाठी सातत्याने चांगले असणारे अग्रणी तंत्रज्ञान शोधण्यासाठी वचनबद्ध आहे. अधिक जाणून घेण्यासाठी भेट द्या fmc.com आणि ag.fmc.com/in/en आणि एफएमसी इंडियाला फेसबुक® आणि यू-ट्यूब®वर फॉलो करा.