शाश्वत कृषी विषयी प्रतिबद्धता दर्शविण्यासाठी, एफएमसी इंडियाने मार्च 22, 2021 रोजी जागतिक पाणी दिवस साजरा केला. यानिमित्ताने 400 शेतकऱ्यांच्या बैठकांचे 18 राज्यात आयोजन करण्यात आले. देशातील शेतकरी समुदायातील 14,000 व्यक्तींपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
इंडिया वॉटर पोर्टल नुसार, भारतातील 80 टक्क्यांहून अधिक पृष्ठभागावरील पाण्याचा वापर शेतीसाठी केला जातो. वाढत्या जागतिक तापमानामुळे पाणी टंचाईत भर पडत आहे. कृषीमध्ये पाणी व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी, एफएमसी तांत्रिक क्षेत्र तज्ज्ञ शेतकऱ्यांच्या शाश्वतता वाढविण्यासाठी सर्वोत्तम कृषी पद्धती आणि पाण्याचा सुयोग्य वापर करण्यासाठी, कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि पाणी संरक्षित करण्यासाठी भिन्न पद्धती सामायिक केल्या.
खराब पाणी सेवनामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी सार्वजनिक जागरूकता वाढविण्यासाठी एफएमसी टीमने सुरक्षित पाण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. निकृष्ट दर्जाच्या पाण्याच्या वापरामुळे देशात गंभीर जलजन्य रोग निर्माण झाले आहेत आणि हे ग्रामीण भागात अधिक गंभीर आहे ज्याचे शेतकरी कुटुंबांवर गंभीर परिणाम होऊ शकतात.
एफएमसी इंडियाचे अध्यक्ष श्री. प्रमोद थोटा म्हणाले, "या जागतिक जल दिनाला, नवीन जल संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वोत्तम पद्धतींबाबत शिक्षित करण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे. आम्ही भारतात तीन दशकांपासून अधिक काळापासून शाश्वतता आणण्यासाठी आणि उत्पादकता सुधारण्यासाठी पीक साखळी आणि भौगोलिक क्षेत्रातील भारतीय शेतकऱ्यांसोबत भागीदारी करीत आहोत. आमच्याकडे जवळपास 4,000 तांत्रिक क्षेत्रीय तज्ञ आहेत जे चांगल्या भविष्याकरिता शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी दोन दशलक्षपेक्षा जास्त शेतकऱ्यांसोबत सहभागी होतात. आमचे ध्येय विविध उपक्रम आणि समुदाय व्याप्ती कार्यक्रम जसे की प्रकल्प समर्थ आणि उगम द्वारे शेतकरी समुदायाचे सबलीकरण आणि त्यांचे जीवनमान उंचाविणे हा आहे.”
भारतातील 200,000 शेतकरी कुटुंबांना आगामी तीन वर्षात सुरक्षित आणि शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी एफएमसी इंडियाने महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. आजपर्यंत, प्रकल्प समर्थ अंतर्गत उत्तर प्रदेश आणि पंजाब राज्यात 44 सार्वजनिक जल शुद्धीकरण संयंत्रे उभारण्यात आली आहेत. ज्यामुळे जवळपास 120,000 शेतकरी कुटुंबांना फायदा होतो. या वर्षापासून कंपनीने पाच राज्यांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे.
एफएमसी उगम या तीन महिन्यांच्या मोहिमेला जागतिक मृदा दिन 2020 5 रोजी प्रारंभ केला जाईल या मोहिमेचे उद्दीष्ट शेतकऱ्यांना जागरूक करणे, माहिती देणे आणि त्यांच्या मातीचे आरोग्य चांगल्याप्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी योग्य साधनांसह सशक्त बनवणे आहे.फेसबुक, व्हॉट्सॲप आणि यूट्यूब सारख्या डिजिटल चॅनेल्सद्वारे 100,000 अधिक अतिरिक्त 40,000 शेतकऱ्यांपर्यंत मोहीम पोहोचली.
"भविष्यातील पिढीसाठी पर्यावरणाचे संरक्षण करताना निर्धोक आणि सुरक्षित अन्न पुरवठा राखणारे उत्पादने वितरित करण्यासाठी एफएमसी वचनबद्ध आहे,". "त्याचवेळी, एफएमसीने देशातील पाण्याच्या वापराशी संबंधित काही समस्यांचे आकलन केले आहे, ज्यामध्ये पाण्याच्या आजारांपासून सुरक्षित ठेवणे आणि भूजल प्रणालीचे संरक्षण समाविष्ट आहे. आमचे कार्य हे भूकमुक्ती आणि स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेच्या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांना सहाय्य करण्यावर लक्ष केंद्रित करते.”