एफएमसी इंडिया केवळ मार्केटचे नेतृत्व मिळवत नाही ; तर भारतातील शेतकऱ्यांना उपाय प्रदान करण्यासाठी करीत असलेल्या नवकल्पनांसाठी आवश्यक मान्यता देखील मिळवत आहे. अलीकडील राष्ट्रीय मान्यतेमध्ये, एफएमसी इंडियाला फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (फिक्की) वतीने दिल्या जाणाऱ्या यावर्षीच्या डिजिटल-तंत्रज्ञान सक्षम कंपनी पुरस्काराने गौरविण्यात आले. 17th मार्च रोजी नवी दिल्ली येथील हॉटेल ताज पॅलेस येथे रसायने आणि पेट्रोकेमिकल्स पुरस्कार 2021 सोहळा संपन्न झाला. वार्षिक पुरस्कार कार्यक्रमात 16 श्रेणीमध्ये व्यक्ती आणि कंपन्यांना भारतीय रसायन उद्योगात दिलेल्या योगदानासाठी सन्मानित केले जाते. यावर्षी डिजिटल-तंत्रज्ञान सक्षम कंपनी पुरस्कार श्रेणीचा समावेश करण्यात आला आहे. शेतकरी संवाद ते वितरक आणि रिटेलर प्रतिबद्धता, कृषी वॅल्यू चेनच्या डिजिटायझेशन करण्यासाठी एफएमसीला सन्मानित करण्यात आले. सार्वजनिक आणि उद्योग व्यवहार संचालक श्री राजू कपूर यांनी एफएमसीच्या वतीने माननीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्री मनसुख मांडवीया यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारला. बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय आणि राज्यमंत्री, रसायन आणि खते मंत्रालय श्री योगेंद्र त्रिपाठी, भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या रसायन आणि पेट्रोकेमिकल्स विभागाचे सचिव श्री. योगेंद्र त्रिपाठी यांच्या उपस्थितीत स्विकारले. एफएमसी इंडिया परिवारातील प्रत्येक घटकाच्या कष्टावर पुरस्काराच्या ज्युरींच्या निर्णयाने शिक्कामोर्तब झाले आहे! तसेच, पुरस्काराच्या आजपर्यंतच्या प्रवासात सहकार्य करणारे बाकुल, विलास ठक्कर आणि अभय अरोरा (पानोली) यांनी घेतलेल्या अपरिमित कष्टाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. ""उद्योग संस्थांद्वारे कार्याला ओळख प्राप्त होणे हा एकप्रकारे सन्मानच आहे" श्री. प्रमोट थोटा, अध्यक्ष, एफएमसी इंडिया. "महामारीने आपल्या देशातील कृषी उद्योगाला प्रभावित केले आहे. एमएमसी टीम संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी कायम वचनबद्ध आहे.".”
|
एफएमसी इंडिया डिजिटल आणि तंत्रज्ञान-सक्षम कंपनी, केमिकल्स आणि पेट्रोकेमिकल्स पुरस्कार 2021 मध्ये सन्मान
मे 18, 2021