एफएमसी इंडियाने आज सतेंदर के सिघाडिया यांची नियुक्ती जाहीर केली आहे. एफएमसी इंडियाच्या मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख म्हणून एप्रिल 01, 2022 पासून कार्यभार सांभाळतील. संजय गोपीनाथ यांच्याऐवजी जबाबदारी स्वीकारतील. सतेंदर हे एफएमसी एपीएसी मनुष्यबळ विभागाला कामाचा अहवाल सादर करतील.
सतेंदर यांच्याकडे 21 वर्षांचा विस्तृत अनुभव आहे आणि मागील नऊ वर्षांपासून एफएमसी सोबत कार्यरत आहे. त्यांच्याकडे भारतीय लष्करात 5 वर्षांपेक्षा जास्त लोकांचे नेतृत्व आणि आयटी/आयटी, सेवा, उत्पादन आणि कृषी-रासायनिक क्षेत्रांमध्ये 15 वर्षांचा एचआर नेतृत्व अनुभव आहे. विलीनीकरण आणि अधिग्रहण, व्यवस्थापन, व्यवसाय आणि लोकांच्या धोरणात्मक संकल्पना, अंमलबजावणी आणि व्यवसाय प्रक्रिया एकीकरण या क्षेत्रात त्यांनी एचआर कार्यस्थळाच्या सर्व क्षेत्रांमध्ये काम केले आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात वाढ आणि बदलाच्या कालावधीतही परिवर्तन उपक्रमांचे नेतृत्व केले आहे.
याप्रसंगी बोलताना रवी अन्नावारापू, अध्यक्ष, एफएमसी इंडिया म्हणाले, "मला आनंद आहे की सतेंदर संस्थेमध्ये - व्यक्ती आणि कार्यप्रणालीच्या नेतृत्वात महत्वाची धूरा सांभाळतील. सतेंदर यांच्याकडे समृद्ध अनुभव आणि उत्कृष्ट लोक व्यवस्थापन कौशल्य आहेत. त्याचा समावेश एफएमसी इंडियाच्या वरिष्ठ नेतृत्व संघाला आणखी मजबूत करेल. सतेंदर यांच्या कौशल्यामुळं निश्चितच विज्ञान-आधारित शाश्वत उपाय प्रदान करणाऱ्या एफएमसी इंडियाच्या परिवर्तनशील प्रवासाला उर्जावान, भविष्य-सज्जतेसाठी प्रोत्साहित करेल.”
सतेंदर के सिघाडिया, एफएमसी इंडिया एचआर हेड, म्हणाले, "भारत आणि जागतिक स्तरावर कृषी क्षेत्रात परिवर्तनाची क्षमता असलेल्या एफएमसीमध्ये ही जबाबदारी घेण्यास उत्सुक आहे. लोक-केंद्रित व्यवहार माझ्यासाठी मध्यवर्ती ठरतो आणि प्रत्येक कर्मचाऱ्यात मूल्य वर्धन करण्यासाठी मी संस्थेत महत्वाची भूमिका बजावेल. जिथे सर्वोत्तम प्रतिभा, सहकार्य, विविधता आणि समावेश आणि कल्याण या सदैव विकसित आणि गतिशील कार्यपद्धतीची मूलभूत मूल्ये आहेत.”
सतेंदर हे एमडीआय गुरुग्रामचे माजी विद्यार्थी आहे. हार्वर्ड मॅनेजमेंटर, थॉमस पर्सनल प्रोफाईल असेसमेंट (पीपीए), करिअर काउंसिलिंग अँड असेसमेंट डेव्हलपमेंट सेंटर (एडीसी) यासह विविध अभ्यासक्रमांत प्रमाणित गाढे व्यासंगी आहेत.