मुख्य घटक वगळा
मेन्यू उघडण्यासाठी क्लिक करा
बंद मेन्यूवर क्लिक करा
मुख्य आशयाला सुरुवात

एफएमसी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि सीईओ मार्क डग्लस यांची भारत-अमेरिका नावीण्य सहयोग गोलमेज परिषदेला हजेरी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे पंतप्रधान बिडन यांची प्रमुख उपस्थिती

राष्ट्रीय, जून 26, 2023: एफएमसी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क डग्लस यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारत - अमेरिका नावीण्यपूर्ण सहयोग, वॉशिंग्टन डी.सी. येथील व्हाईट हाऊस येथे शुक्रवारी आयोजित तंत्रज्ञान गोलमेज परिषदेत भेट घेतली. पंतप्रधानांच्या अमेरिकेच्या चार दिवसीय राज्य दौऱ्याचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही देशांमधील परस्पर हितसंबंध आणि सहकार्याच्या तंत्रज्ञान क्षेत्रांवर चर्चा करणे हे कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते आणि गोलमेज परिषदेला अमेरिका व भारतातील आघाडीच्या कंपन्यांच्या सीईओंची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या उपस्थित संपन्न झालेल्या गोलमेज परिषदेत सहभागी होणारी एफएमएसी ही एकमेव कृषी-केंद्रित कंपनी होती.. या कार्यक्रमादरम्यान, सहभागींनी विविध क्षेत्रांमधील सामायिक तंत्रज्ञान इकोसिस्टममधील नावीन्यपूर्ण संधीं विषयी चर्चा केली. श्री. डग्लस यांनी पीक संरक्षण उद्योगातील दृष्टीकोन सामायिक केलेय याविषयी भाष्य करताना, तंत्रज्ञान या क्षेत्रातील नवकल्पनांना कशाप्रकारे चालना देत आहे. डिजिटल आणि अचूक कृषी साधनांपासून ड्रोन पर्यंत आणि नवीन रेणूंचा शोध कसा घेत आहे या विषयी भाष्य केले.. यामुळे पिकांचे संरक्षण आणि अन्न उत्पादन वाढवण्यासाठी अधिक प्रभावी, कार्यक्षम आणि टिकाऊ पद्धती निर्माण झाल्या आहेत. भारतभरातील शेतकऱ्यांना अमेरिका आणि जगभरातील सर्वात प्रगत पीक संरक्षण तंत्रांचा जलद प्रवेशयोग्यता असल्याची खात्री करण्यासाठी अधिक कार्यक्षम नियामक आणि नोंदणी प्रणालीची आवश्यकता वर देखील त्यांनी भर दिला.

Mark with Modi“अन्य उद्योगातील तांत्रिक प्रगतीचा थेट लाभ कृषी क्षेत्राला मिळत आहे आणि आगामी काळातही मिळत राहणार आहे.. भारत आणि जगभरातील शेतकऱ्यांसाठी आघाडीवर शाश्वतता आणि सुरक्षेसह कृषी प्रगतीसाठी तंत्रज्ञान एकीकरण निश्चितच महत्वाची भूमिका बजावणार आहे.. गोलमेज परिषदेमुळे सरकार आणि कंपन्यांना सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी एकत्रित व्यासपीठाची उपलब्ध झाल्याची भावना, मार्क डग्लस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.. “जागतिक स्तरावर एफएमसी साठी भारत हे तीन प्रमुख मार्केटपैकी एक आहे. जगभरातील कृषी-तांत्रिक उद्योगाच्या होणाऱ्या विकासामुळे भारतीय कृषी परिसंस्था अधिक अनुकूल होण्यासाठी आणि कृषी रसायनांच्या नियामक आणि नोंदणी प्रणालीची कार्यक्षमता कशी वाढवायची याचा विचार धोरणकर्त्यांनी करणे समर्पक आणि महत्त्वपूर्ण आहे. एफएमसी सारख्या कृषी कंपन्यांना भारतीय शेतकर्‍यांसाठी सूक्ष्मजीव आणि फवारण्यायोग्य फेरोमोन यांसारखे नवीनतम, अधिक टिकाऊ तंत्रज्ञान त्वरित बाजारात आणण्यासाठी समर्थन करेल, परिणामी आज आणि उद्यासाठी अधिक लवचिक अन्न प्रणाली आणि अन्न सुरक्षा मिळेल..”एफएमसीने नेहमीच उत्पादकांना निर्मित आणि जैविक पीक संरक्षण आणि पोषण उत्पादनांपासून ते युनिक अॅप्लिकेशन प्रणालीपर्यंत नाविन्यपूर्ण उपाय सादर करण्यावर भर दिला आहे. श्री.डग्लस हे नुकतेच मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांसाठी ड्रोन स्प्रे सेवेचा शुभारंभ करण्यासाठी भारत दौऱ्यावर आले होते.. कृषी कार्यक्षमता तसेच उत्पन्न सुधारण्यासाठी ड्रोन्स आणि इतर प्रगत ॲप्लिकेशन प्रणालीची उपयुक्तता महत्त्वाची ठरली आहे. ड्रोन्स द्वारे शेतातील मशागतीसाठी लागणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेळेत निश्चितच बचत होते. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे हवामान संबंधित जोखीमांपासून संरक्षण सुनिश्चित होते. ज्यामुळे डिहायड्रेशन आणि हीट स्ट्रोक होऊ शकतो.भारत सरकारने कृषी उद्योगाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने पाऊले टाकत असताना, एफएमसीने तीन दशकांहून अधिक काळ देशाप्रती सदैव आपली कटिबद्धता जोपासली आहे.श्री. डग्लस यावेळी पुढे बोलताना म्हणाले, “या ऐतिहासिक सभेत सहभागी होणे आणि कृषी उद्योगासाठी कार्यरत राहणं निश्चितच सन्मानजनक बाब आहे". एफएमसीला निमंत्रित केल्याबद्दल आम्ही राष्ट्राध्यक्ष बायडन, पंतप्रधान मोदी, मंत्री जयशंकर, सचिव क्वात्रा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल, सचिव सिंग, राजदूत संधू आणि भारत आणि अमेरिकन सरकार यांचे आभारी आहोत..”भारत – अमेरिका नावीण्यपूर्ण सहयोग गोलमेज परिषदेचे संचलन अमेरिकेचे वाणिज्य सचिव जीना रायमोंडो यांनी केले. या परिषदेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन, नॅशनल फाउंडेशनचे संचालक सेथुरामन पंचनाथन आणि राष्ट्रीय हवाई आणि अवकाश विभागाचे संचालक बिल नेल्सन यांच्यासह भारत सरकारचे अधिकारी उपस्थित होते.. जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रांमधील सातत्यपूर्ण भागीदारी शाश्वत भारतीय कृषी उद्योगासाठी अफाट क्षमता आणि शक्यतांचे सामायिक भविष्याची दिशा निश्चित करेल.एफएमसी विषयी

एफएमसी कॉर्पोरेशन ही जागतिक दर्जाची कृषी विज्ञान कंपनी आहे. उत्पादकांना बदलत्या वातावरणाशी जुळवून घेत वाढत्या जागतिक लोकसंख्येसाठी अन्न, खाद्य, तंतू आणि इंधनाच्या निर्मितीसाठी सज्ज करण्यास समर्पित आहेत.. एफएमसीचे नाविन्यपूर्ण पीक संरक्षण उपाय - जैविक, पीक पोषण, डिजिटल आणि अचूक कृषी सहित - उत्पादक, पीक सल्लागार आणि हरळी (टर्फ) आणि कीटक व्यवस्थापन व्यावसायिकांना पर्यावरणाचे संरक्षण करताना आर्थिकदृष्ट्या त्यांच्या सर्वोत्तम आव्हानांचे निवारण करण्यास सक्षम करतात. जगभरात शंभराहून अधिक कार्यस्थळावर अंदाजे 6,600 कर्मचाऱ्यांसह, एफएमसी नवीन तणनाशक, कीटकनाशक आणि बुरशीनाशक सक्रिय घटक, उत्पादन तयार करणे आणि ग्रहासाठी सातत्याने चांगले असणारे अग्रणी तंत्रज्ञान शोधण्यासाठी वचनबद्ध आहे. अधिक जाणून घेण्यासाठी भेट द्या fmc.com आणि ag.fmc.com/in/en आणि एफएमसी इंडियाला फेसबुक® आणि यू-ट्यूब®वर फॉलो करा.