मुख्य घटक वगळा
मेन्यू उघडण्यासाठी क्लिक करा
बंद मेन्यूवर क्लिक करा
मुख्य आशयाला सुरुवात

कोविड-19 विरुद्धच्या लढाईला एफएमसी कॉर्पोरेशनचे बळ, 7 ऑक्सिजन संयंत्रे उभारणार

एफएमसी इंडिया भारतात कोविड-19 निर्मूलनासाठी आपली वचनबद्धता घोषित केली आहे. पाच राज्यात ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये वाढ आणि कोविड-19 विषाणू प्रसारास आळा घालण्यासाठी ग्रामीण भागात उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

 

ऑक्सिजन पुरवठ्याला गती

भारत सरकार नुसार, रुग्णालयातील ऑक्सिजन आणि आरोग्य सुविधांची मागणी ही महामारी पूर्वी असलेल्या मागणीपेक्षा दहा पटींनी वाढली आहे. कोविड-19 रुग्णांच्या वाढत्या प्रकोपामुळे कोरोना बाधित गंभीर रुग्णांना आपत्कालीन स्थितीत वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही. एफएमसी इंडिया सात प्रेशर स्विंग ॲडॉर्सप्सन (पीसीए) ऑक्सिजन संयंत्राची दिल्ली, एनसीआर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात मधील रुग्णालयात उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे या रुग्णालयातील पीएसए ऑक्सिजन संयंत्रासाठी आम्ही वाहतूक व्यवस्थापन आव्हानांना सामोरे जाऊन निरंतर ऑक्सिजन पुरवठा करण्यास सक्षम आहोत.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा देश सामना करत असताना, या उपक्रमांमुळे मागणी सापेक्ष पुरवठा करण्यास सक्षम असेल, 1,680Nm3 ऑक्सिजनचा दैनंदिन पुरवठा स्थानिक रुग्णालयांना करण्याद्वारे कोविड-19 विरुद्धच्या लढाईत हातभार लावत आहे.

संपूर्ण देशाला COVID-19 च्या दुसऱ्या लाटेची तीव्रता आणि भीषणता यांनी आव्हान दिले. ज्यामुळे वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या वाढत्या मागणीमुळे पुरवठ्याची कमतरता निर्माण झाली. रुग्णालयामध्ये आपत्कालीन ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी आणि मौल्यवान जीवाच्या रक्षणासाठी एफएमसी इंडियाने सात पीएसए प्लांटची उभारणी केली. आम्ही आमचे चॅनेल पार्टनर आणि समुदायांसोबत भागीदारी करण्यासाठी वचनबद्ध आहोत जेणेकरून भारतातील आरोग्य सेवेसाठी सहाय्य करता येईल - विशेषत: ग्रामीण भागात असलेले उच्च COVID-19 दर आणि संसाधनांची कमतरता.”

 

ग्रामीण जागरूकता मोहीम

कोरोना विषाणूचा प्रसार दुसऱ्या लाटेदरम्यान ग्रामीण भारतात दिसून आला. एफएमसी इंडिया स्थानिक शेतकऱ्यांना आणि उत्पादकांना कोविड-19 पासून संरक्षित करण्यासाठी सुरक्षा आणि आरोग्य उपाययोजनांविषयी शिक्षित करण्याच्या उद्देशाने शेती आणि सर्वोत्तम कृषी पद्धती वापराच्या मोहिमेसह एक बहुआयामी मोहिम हाती घेईल. भारतातील बहुतांश आघाडीच्या कृषीप्रवण राज्यातील 100,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा जागरुकता मोहिमेचा उद्देश आहे. हे सर्व प्रयत्न एफएमसी इंडियाच्या वर्तमान समुदाय सशक्तीकरण उपक्रम- प्रकल्प समर्थचा भाग आहेत.