एफएमसी कॉर्पोरेशनने भारतातील गुजरात राज्यातील पानोली औद्योगिक क्षेत्रात सौर ऊर्जा निर्मितीचा दुसरे केंद्र सुरू केले आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात आरंभ केलेल्या पहिल्या प्रकल्पानंतर यशस्वीपणे दुसरा प्रकल्प हाती घेतला आहे.
एफएमसीचे पानोली प्रकल्प सध्या 20 टक्के त्याच्या एकूण ऊर्जा आवश्यकतेच्या 50 MW सौर उर्जा संयंत्रातून प्राप्त करीत आहे. केपीआय ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, गुजरात वीज वहन महामंडळ लि (गेटको) आणि गुजरात ऊर्जा विकास प्रकल्प (गेडा) यांच्या संयुक्त करारान्वये कार्यान्वित आहे.
गेल्या दोन वर्षापासून किमान व्यत्ययासह एफएमसीच्या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट ऊर्जा सुलभ प्रक्रियेत पारंपरिक ऊर्जेच्या वापरात घट दिसून आली आहे. पानोली उत्पादक केंद्रावरील सौर ऊर्जेचा वापर हा कार्बन उत्सर्जनातील घट आणि स्थानिक नागरिकांना आरोग्यदायी आणि सुरक्षित राहणीमान प्रदान करणे हा उद्देश आहे”, असे एफएमसीचे अध्यक्ष प्रमोद थोटा म्हणाले.
सौर ऊर्जा वापरामुळे प्लांटचे उत्सर्जन कमी करण्याद्वारे शून्य ग्रीनहाऊस गॅस ऊत्सर्जन अपेक्षित आहे (जीएचजी) प्लांटचे एकूण उत्सर्जन 2,000 टनांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
थोटा पुढे म्हणाले, "वीजेची संभाव्य मागणी विचारात घेता सौर आणि पवन दोन्हीं पासून अधिक वीज निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सौर ऊर्जा वापरास प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारच्या प्रयत्नांदरम्यान, देशाच्या उत्पादन उद्योगाचे मानक स्थापित करण्यासाठी एफएमसीचे शाश्वतता उपक्रम महत्वपूर्ण ठरतील.”
आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी (आयईए) च्या अहवालानुसार, भारतामध्ये पुढील दोन दशकांमध्ये जागतिक स्तरावर ऊर्जा मागणीमध्ये सर्वात मोठी वाढ दिसण्याची अपेक्षा आहे आणि 2030 पर्यंत युरोपीय युनियन नंतर ऊर्जा वापर करणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरणार आहे.