आमच्या उद्योगात यशासाठी मागणीची निर्मिती महत्त्वाची आहे. त्यामुळे उत्पादन केपीआय आणि अंतिम मूल्य वितरण शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या प्रतिबद्धतेच्या स्वरुपात प्रदर्शित केली जाते. समाधानाच्या भावनेतून ग्राहकांची निर्मिती होते.
2020 मध्ये आम्ही केवळ कोविड महामारीशी लढलो नाही, तर ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही नवीन मार्गही शोधले. ज्यापैकी एक ई-क्षेत्र आहे (मागील भागात कव्हर केले आहे). आणि या प्रत्येक फॉरमॅटमध्ये तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला आणि सुधारणांचे अनेक मार्ग शोधून काढले. आमच्या प्रदर्शनीय प्लॉट्सचे सौंदर्य कैद करण्यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर हे सर्वात नवीन पाऊल आहे.
अथॉरिटी® नेक्स्ट, नवीन पिढीचे तणनाशक या वर्षी महाराष्ट्रातील सोयाबीन शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे; आमच्या प्रायोगिक प्रकल्पासाठी ते अतिशय यशस्वी ठरले आहे. आमची टीम व्हॉट्स अप व्हिडिओ कॉल्स, झूम आणि थेट भेटींद्वारे 27000+ शेतकऱ्यांसोबत थेट कनेक्ट झाली होती, तर आम्ही हाय डेफिनेशन ड्रोन कॅमेऱ्यासह ई-शेतांत देखील पुढील पातळी गाठण्याचा विचार केला आहे.
अथॉरिटी® नेक्स्ट दिवस 1 पासून तणावर उत्कृष्ट नियंत्रण प्रदान करते आणि 40डीएएस मध्ये केपीआय सर्वात महत्त्वाचे आहेत ज्यामध्ये निरोगी पीक व्यवस्थित आणि स्वच्छ, तणमुक्त शेतात वाढते. आम्ही प्रक्रिया केलेल्या प्लॉटच्या हवाई दृश्यासाठी 4 फूट, 10> फूट, 70 फूट आणि पुढे 100 फूटापर्यंत उंचीवर दृश्यचित्र घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला. त्यातून जे निष्पन्न झाले त्याचे सौंदर्य थक्क करणारे होते; काही झलक येथे दिल्या आहेत.
आम्ही फुलाच्या अवस्थेमध्ये कोराजन ® वापरल्यानंतर 85-90DAS ला पुढील शूटची योजना बनवली आहे. या टप्प्यावर केवळ तणनाशकाचे केपीआयच नव्हे, जोमदार हिरव्या आणि घनदाट फळांमध्ये दिसणाऱ्या उत्कृष्ट कीटकांच्या संरक्षणाचा परिणाम देखील कॅप्चर केला जाईल. आमच्या उत्पादनांविषयी चर्चा होऊन आणि मागणी वाढण्यासाठी हे व्हिडिओ विविध फोरममध्ये शेतकऱ्यांच्या बैठकांसाठी वापरले जातील.
ड्रोन कॅमेराने आम्हाला एक नवीन अफाट असे 100 फूट हाय हॉरिझोन दाखवले आहे. आम्ही आगामी काळात सर्वोत्तमता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू.