ॲरेजन लाईफ सायन्सेस (पूर्वी, जीव्हीके बायो) आणि एफएमसी कॉर्पोरेशन धोरणात्मक भागीदारी करण्यास सहमत आहे.. या सहयोगाद्वारे, ॲरेजन एफएमसीच्या जागतिक शोध आणि विकासाच्या गरजांना सहाय्य करेल, ज्यामध्ये शोध रसायनशास्र, शोध जीवशास्त्र आणि रासायनिक प्रक्रिया विकास यांचा समावेश होतो.
ही भागीदारी एफएमसी कॉर्पोरेशनच्या ॲग्रो-केमिकल विकासाला गतिमान करण्यावर लक्ष केंद्रित करते.. "या दीर्घकालीन भागीदारीद्वारे एफएमसीला मदत करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. कारण एफएनसी पीक विज्ञानातील जागतिक स्तरावरील अग्रगण्य कंपनी आहे.. शोध आणि विकासाच्या सर्व पक्षांद्वारे या सहयोगाचा विस्तार हा एफएमसीचा अरॅजनवर असलेला विश्वास आणि आत्मविश्वासाचे प्रमाण आहे- आम्ही आमच्या भागीदारासाठी अनेक यशस्वी कथा घेऊन येण्यास उत्सुक आहोत" असे अरॅजनचे सीईओ मन्नी कांतीपुडी यांनी सांगितले.
भागीदारी कराराबद्दल बोलताना एफएमसी कॉर्पोरेशनच्या संशोधन आणि विकास विभागाच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी कथलीन शेल्टन म्हणाल्या, "अरॅजन अनेक वर्षांपासून एफएमसीचा महत्त्वाचा भागीदार आहे." डॉ. कॅथलीन शेल्टन यावेळी म्हणाल्या की, "ही भागीदारी संशोधन आणि विकासातील अनेक विषयांमध्ये वाढत आहे आणि आम्ही आमच्या चांगल्या कामाच्या संबंधाची प्रशंसा करतो.."