एफएमसी इंडिया शेतकरी समुदायाची सेवा करण्यासाठी आणि भारतातील शाश्वत कृषीला प्रोत्साहन देण्यासाठी सतत संशोधन करीत आहे. 2018 च्या उत्तरार्धात भारतातील मका पिकांवर हल्ला करणाऱ्या लष्करी अळी (आर्मीवर्म) (एफएडब्ल्यू) च्या समस्येचा सामना करण्यासाठी, एफएमसीने भारतातील सायन्स ॲडव्होकेसी थिंक टँक साऊथ एशिया बायोटेक कन्सोर्टियम (एसएबीसी) सोबत करार केला. खालील उद्देशांसह प्रकल्पाला एफएमसी प्रकल्प सफल म्हणून (लष्करी अळीपासून कृषी आणि शेतकऱ्यांचे संरक्षण) नाव देण्यात आले आहे:
- वैज्ञानिक डाटा आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्त्रोतांकडून मिळालेल्या विश्वसनीय अहवालातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारावर ज्ञान संसाधनांच्या स्त्रोतांचा विकास करणे
- एकीकृत कीटक व्यवस्थापन (आयपीएम) पॅकेज प्रदर्शित करण्यासाठी संबंधित कृषी विज्ञान केंद्र (केव्हीकेएस) च्या सहकार्याने कृषी प्रदर्शन आयोजित करणे
- माहिती प्रसारासाठी व्यापक नेटवर्क आणि संस्था सह एफएडब्ल्यू साठी समर्पित वेब-आधारित पोर्टल
- क्षमता निर्माण आणि कौशल्य विकास कार्यक्रम
प्रकल्पाचे उद्घाटन एफएमसी आशिया पॅसिफिक रिजनच्या अध्यक्ष श्रीमती बेथविन टॉड, एफएमसी इंडिया अध्यक्ष श्री. प्रमोद आणि एफएमसी इंडिया लीडरशिप टीमचे सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रकल्प सफल खऱ्या अर्थाने सर्वांना अभ्यासण्यासाठी केस स्टडी ठरली आहे. आंतरराष्ट्रीय संयंत्र संरक्षण परिषद, आशियाई सीड काँग्रेस, एफएडब्ल्यू कॉन्फरन्स इंडोनेशिया इत्यादींसारख्या विविध जागतिक आणि स्थानिक व्यासपीठावर तळागाळात पोहचलेला विस्तारित प्रकल्प असल्याचे कौतुक करण्यात आले.
गेल्या 18 महिन्यांपासून शेतकऱ्यांमध्ये आणि अन्य भागधारकांमध्ये जसे की शासकीय अधिकारी, कृषी विद्यापीठे, केव्हीके, एनजीओ इ. मध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रकल्प सफल कार्यरत आहे. घातक कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी सर्वोत्तम कृषी पद्धतींना प्रोत्साहन दिले जाते आणि जागरुकता आणि क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी देशाला सर्वोत्तम बनविणे.
एफएडब्ल्यू संकेतस्थळ विकासwww.fallarmyworm.org.in प्रकल्प अंतर्गत करण्यात आला. भारतात किटकनाशकांच्या बाबतीत घडणाऱ्या सर्व घडामोडींसाठी संदर्भ आणि अद्ययावत माहिती प्रदान केली जाते. मका उत्पादक राज्यात कृषी विभाग आणि विद्यापीठ यांद्वारे जागरुकता निर्माण करण्यासाठी जाहिरात साहित्य जसे की पोस्टर्स, परिपत्रके, मनोरंजन साहित्य इ. यांचा वापर केला जातो.
प्रकल्प सफलने उत्कृष्ट परिणाम साध्य करण्यासाठी कॉर्पोरेट व्यवहार, नियमन, संशोधन आणि विकास आणि व्यावसायिक टीमसह एकत्रित प्रयत्नांद्वारे उत्कृष्ट कार्यशैलीच्या एफएमसी संस्कृतीचे उदाहरण स्थापित केले आहे. प्रकल्पाचा वार्षिक अहवाल नुकताच दिल्लीमध्ये प्रकाशित करण्यात आला.
महत्वाकांक्षी ज्ञान नेतृत्व मोहिमेच्या यशस्वी 2 वर्षांच्या पूर्तता साजरी करताना, सफल टीमने अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदविले आहेत.
“आमच्या विस्तृत जागतिक ज्ञान आणि शाश्वत उपायांद्वारे भारतातील शेतकऱ्यांना सेवा देण्याची ही संधी आमच्याकडे आहे. आम्ही उपलब्ध होत असलेल्या संधीमुळे आनंदी असल्याचे प्रतिपादन बेथविन यांनी केले. मुंबई मुख्यालयातून मे 2019 मध्ये प्रकल्पाची सुरुवात करताना ते बोलत होते.
“लष्करी अळी सारख्या कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी भारतीय शेतकऱ्यांना सशक्त बनवणे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि शेतीची शाश्वतता वाढविण्यासाठी प्रकल्प सफल हा एफएमसीने हाती घेतलेला उपक्रम आहे. प्रकल्प सफल सह या प्रयत्नात एसएबीसी सोबत भागीदारी करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो." - प्रमोद थोटा, एफएमसी भारत अध्यक्ष, एजीएस बिझनेस डायरेक्टर.
“आम्ही एकत्रितपणे खेड्यातील कृषी-विस्तार प्रणालीमध्ये लक्षणीय क्रांती केली आहे. आयसीएआर संस्था, केव्हीके, एसएयू, आणि राज्य कृषी विभाग आणि एनजीओ सह आम्ही भारतातील सामाजिक-आर्थिक, अन्न आणि खाद्य सुरक्षेला धोका टाळण्यासाठी सहाय्य करू शकू.", - डॉ सी डी मायी, अध्यक्ष, दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्र.
“प्रकल्पाचे यश हा एफएमसी टीमच्या शास्त्रीय प्रयत्नाचा एक उत्तम नमुना आहे. ज्यामध्ये सरकारी व्यवहार, नियामक, संशोधन व विकास आणि व्यावसायिक टीम यासर्वांचे एकत्रित प्रयत्न सामावलेले आहेत.. एपीएसी स्तरावरील प्रकल्पाचे अंतर्गत मूल्यमापन अत्यंत समाधानी आहे" - राजू कपूर, प्रमुख-सार्वजनिक आणि उद्योग व्यवहार.